स्वस्तात साड्याचे आमिष दाखवून पावणे पाच लाखांना लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : स्वस्तात पैठणी साड्या देण्याचे आमिष दाखवून पालघरच्या व्यक्तीला तब्बल पावणे पाच लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे.

डहाणू पालघर येथील रहिवासी विकास आत्माराम पाटील यांना आरोपी विनोद चव्हाण यांनी त्यांच्या ओळखीचे नीलेश राऊत यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपणास येवले येथून स्वस्तात पैठणी साड्या देतो, असे आमिष दाखवले.

त्याप्रमाणे चव्हाण याने पाटील यांना ओगदी शिवारातील बोकटा रस्त्यावर बोलावले. तेथे अगोदरच त्याचे १० ते १२ साथीदार हजर होते.

त्यांनी पाटील यांच्याकडील रोख २ लाख ६० हजार रुपये, पत्नीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र,कानातील सोन्याचे झुमके, एक तोळे सोन्याची बांगडी, एमआय व विवो कंपनीचे ३ मोबाईल, सोन्याच्या अंगठी, दीड तोळा सोन्याची चेन, ५ ग्राम सोन्याची अंगठी व निलेश राऊत यांच्या जवळील रोख १ हजार ५०० असा एकूण ४ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटला.

याबाबत आधिक तपास कोपरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24