अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : गेल्या दोन दिवसांपासून पारनेर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे सेना नगरसेवकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश झाल्यानंतर विविध नेते यावर प्रतिक्रिया व स्पष्टीकरण देत आहेत.
पारनेर नगर पंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश हा शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून झालेला आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबत अगोदरच कल्पना देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी आज आ. रोहित पवार यांनी दिले आहे. आ. पवार हे नगर शहरात आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. या पक्षाचे पारनेर शहरातील नगरसेवक राष्ट्रवादीत आल्याने आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याने
महाविकास आघाडीत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा राज्यभरात रंगली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी या पक्षप्रवेशापूर्वी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केलेली होती. जर या नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला नसता तर त्यांनी भाजपात प्रवेश केला असता.
त्यामुळे पारनेरमधील महाविकास आघाडीची सत्ता गेली असती. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे आ. लंके यांनी सांगितल्याचे आ. रोहित पवार म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews