अहमदनगर बातम्या

‘या’ पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद; महत्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रावसाहेब पटवर्धन पतसंस्थाचा (विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेता) सरव्यवस्थापक रत्नाकर पंढरीनाथ बडाख याला गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे.

त्याच्याकडून काही महत्वाचे कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहे. ती जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली.

पतसंस्थेतील ठेवीदांराच्या पैशांचा अपहारप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी, नगर तालुका उपनिबंधक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी पतसंस्थेच्या अध्यक्षा लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी, प्रकाश नथ्थू सोनवणे, लक्ष्मण सखाराम जाधव या चौघांना अटक केली होती.

या गैरव्यवहारप्रकरणी महत्वाची माहिती असलेला पतसंस्थेचा सरव्यवस्थापक बडाख याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे गैरव्यवहारप्रकरणी चौकशी केली. त्याच्याकडून अधिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

दरम्यान गैरव्यवहाप्रकरणी आवश्यक असलेली महत्वाची कागदपत्रे पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली आहेत. त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक जाधव यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office