अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालाची तपासणी करून तो व्यवस्थितरित्या आहे की नाही याची पडताळणीची मोहिम सुरू केली आहे.
महिनाभरात ती पूर्ण केली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार मुद्देमाल तपासणीस सुरूवात झाली आहे.
पोलिसांच्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा ठाण्यातील कारकुन यांच्या कब्जामध्ये ठेवला जातो. यामध्ये आरोपीकडून जप्त केलेली रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिण्यासह वेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात.
जप्त मुद्देमालाची देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित नेमून दिलेल्या कर्मचारी व अधिकार्यांची असते. सदरचा मुद्देमाल हस्तगत झाल्यानंतर तो न्यायालयाच्या आदेशानुसार सोडवायचा अथवा जप्त ठेवायचा याबाबत सुद्धा निर्देश दिलेले असतात,
त्याची सुद्धा अंमलबजावणी व्यवस्थित होती की नाही तसेच पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हा योग्य पद्धतीने आहे की नाही याची पडताळणी होणे गरजेचे असते.
त्यानुसार जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये असलेला मुद्देमाल हा व्यवस्थितरित्या सांभाळला जातो की नाही किंवा मुद्देमाल कशा पद्धतीचा आहे, याची पडताळणी एक महिनात केली जाणार आहे.