‘मातोश्री’ वरूनच ठरेल अहमदनगरचा महापौर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर मधील शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज अशी ओळख असलेले अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेचा आवाज कमी झाल्याचे बोलले जात आहे.

याच धर्तीवर राठोड यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले शिवसेनेचे नगर शहरातील नगरसेवक, पदाधिकारी शुक्रवारी जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांच्या भेटीसाठी सोनईत पोहचले.

शहरातील शिवसेना पक्षाची पक्ष संघटना वाढवणे, शहरात शिवसेनेचे प्राबल्य असले तरी महापालिकेत कामे होत नाहीत. शहरातील जनतेला कोरोना संसर्गात प्रभावीपणे मदत व्हावी,

यासाठी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नेते यांनी त्यांची भेट घेलती. सर्व नगरसेवक आणि सामान्य शिवसैनिकांनी मंत्री गडाख हे सर्वमान्य नेतृत्व असल्याचे मान्य केले असल्याचे,

स्पष्टीकरण शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगांवकर यांनी दिले आहे. या बैठकीत शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.

प्रत्यक्षात अशी कोणतीही वादावादी या बैठकीत झाली नाही. उलट गडाख यांचे नेतृत्व सर्वसामान्य असून त्यांनीच शिवसेना पक्ष वाढीसाठी तालुकानिहाय बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महापौर पदाची निवड चिठ्ठीद्वारे करण्याची पद्धत शिवसेनेत नाही. पुढचा महापौर कोण असेल याबाबत निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे हेच घेतील. याबाबतचा आदेश मातोश्रीवरूनच येईल, असे ठामपणे कोरेगावकर यांनी सांगितले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24