अहमदनगर बातम्या

मराठा आरक्षण न देण्याचा मेसेज झाला व्हायरल !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सोशल मीडियावर ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये’, असे पत्र मंत्रालयात पाठवले गेले असल्याचा मेसेज व्हायरल झाला; मात्र त्या मेसेजचा व माझा काही संबंध नाही,

त्या मेसेज व्हायरल करणाऱ्याविरोधात राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या प्रकाराची लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा सावता माळी युवक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी दिली आहे.

अशोक तुपे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आपण वांबोरी येथील रहिवासी असून सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतो. मराठी समाजातच कार्यरत असतो.

एक गरीब कुटुंबातील बेरोजगार असून प्रत्येक गावातील आठवडे बाजारामध्ये मुरमुरे विकून कुटुबांची उपजीविका भागवत आहे; परंतु काही समाजकंटकांनी जाणूनवजुन बदनाम करण्याचे षडयंत्र रचले असुन त्या मेसेज आणि आपला कुठलाही संबंध नाही.

मला अनेक बांधवांचे फोन आले. तुम्ही बाजारात येऊ नका, असे मेसेजपण आले, तरी आपण सर्व तरुण बांधवांना विनंती करतो, की आपण कुठल्याही प्रकारचे मंत्रालयात पत्र पाठविलेले नसून आपल्या नावाचा गैरवापर करून बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे.

आपण तातडीने राहुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मेसेज पाठविणाऱ्याच्या विरोधात रीतसर तक्रार दिली असून त्याची लवकरच शहानिशा होईल. ज्यांनी बदनामीकारक मैसेज पाठवले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय आपण माघार घेणार नाही. मराठा समाजाबरोबर आहे त्यामुळे झालेला गैरसमज दूर व्हावा, अशी अपेक्षा तुपे यांनी व्यक्त केली आहे.

Ahmednagarlive24 Office