कोरोनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले ‘हे’ उपाय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. एकूण बाधितांचा आकडा ११ लाखांच्या पार गेला आहे. या काळात लोकांना प्रतिकार शक्ती अर्थात इम्युनिटी पावर वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने काही उपाय सांगितले आहेत.

त्या आधारे तुम्ही तुमची प्रतिकार शक्ती वाढवू शकता.

१) काढा : काढा बनवण्यासाठी तुळस, दालचिनी, काळी मिरी, आलं, मनुका पाण्यात एकत्र उकळवून, त्यानंतर ते गाळून हा काढा प्यावा.

२) च्यवनप्राश : दररोज एक चमचा च्यवनप्राश खाऊन दिवसाची सुरुवात करा. ज्या लोकांना मधुमेधाची समस्या आहे, त्या लोकांनी शुगर फ्री च्यवनप्राश खावं.

३) मसाल्यांचा वापर : जेवणात रोज हळद, जीरं धणे, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. मसाल्यांच्या वापराने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

४) योगा/व्यायाम : दररोज दिवसांतून कमीत कमी 30 मिनिटं तरी योगासनं, प्राणायम, ध्यान-धारणा आवश्यक करावी.

५) गरम पाणी पिणे: आयुष मंत्रालयाशिवाय आयसीएमआरनेही दर काही वेळाने गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. आयुर्वेदात याचे अनेक फायदे आहेत.

गरम पाणी प्यायल्याने जठराग्नी व्यवस्थित राहतो. त्यामुळे आजार उद्भवत नाहीत. गरम पाणी प्यायल्याने इंट्री पॉईंटवर म्हणजेच घश्यात व्हायरस आपली संख्या वाढवू शकत नाही.

६) हळदी दूध – – हळद घातलेलं दूध पिणे उत्तम असते. १५० ग्राम दुधात अर्धा चमचा हळद मिक्स करा.हळदीत अनेक एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी व्हायरल गुण असतात.

७) नारळाचे तेल, तिळाचं तेल किंवा तुप नाकाच्या छिद्रांमध्ये लावल्यास फायदेशीर ठरेल.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24