अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-शहरातील वाढती गुन्हेगारीची वाटचाल पाहता जिल्ह्याची प्रतिमा गुंडाराज झाली आहे. जाब विचारला म्हणून टोळक्याकडून एकास बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे.
विशेष म्हणजे या १४ जणांच्या टोळक्याने संबंधितास चाकू, तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. हि घटना शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सावेडीच्या यशोदानगरमधील पानटपरीसमोर घडली आहे.ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 14 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य लोखंडे, भुजंग लोखंडे, हरिश नायर, काशिनाथ बबन शिंदे, दुर्गा शिंदे, सनि शिंदे, शुभम धनगर, विशाल फुंदे, मुसा शिंदे, सचिन शिंदे (सर्व रा. वैदुवाडी, नगर) व अनोळखी चार इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी कि, फिर्यादी मयुर बाळासाहेब सोमवंशी (वय- 21 रा. पद्मानगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यशोदानगरमधील पानटपरी जवळ आले. यावेळी आरोपी फिर्यादीला विनाकारण शिवीगाळ करून लागले. यावेळी फिर्यादी त्यांना म्हणाले, तुमचे माझे वाद नाही
, तुम्ही मला विनाकारण शिवीगाळ करू नका,असे म्हणताच आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved