अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात (गवई गट) विविध पक्षातील मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील युवकांनी प्रवेश केला.
तसेच आरपीआयच्या शहर उपाध्यक्षपदी जावेद सय्यद तसेच आरपीआय अल्पसंख्यांक विभागाच्या शहर प्रवक्तापदी जमीर इनामदार व उपाध्यक्षपदी अरबाज शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी नुतन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देऊन युवकांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आरपीआयचे कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, मुस्लिम विकास परिषदचे दानिश जहागीरदार उपस्थित होते.
यावेळी ऋषी विधाते, मिलिंद शिंदे, जावेद पटेल यांनी आपल्या मित्रांसह आरपीआय मध्ये प्रवेश केला. यावेळी प्रविण वाघमारे, महेश फरताळे, शफिक मोघल, सागर विधाते, शिवम साठे, कार्तिक भिंगारदिवे, कुनाल म्हस्के, आनंद जगताप, प्रतिक विधाते
, अॅड. नुमेर शेख, सलमान सय्यद, फुरकान शेख, दानिश इनामदार, अरबाज शेख, अफ्फान शेख आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुशांत म्हस्के म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सर्व समाजातील युवकांना संधी देण्यात येत आहे.
देशाचे राजकारण जातीयवादी बनले असून, जातीयवादाला थोपावण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचे काम चालू आहे. अल्पसंख्यांक समाजाला व शेतकर्यांना गुलाम बनविण्याचे कारस्थान मोदी सरकार करीत आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने पक्ष आपली वाटचाल करीत आहे.
मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजाला प्रवाहात आनण्यासाठी आरपीआय कटिबध्द असून, प्रत्येक प्रभागात शाखा उघडणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
दानिश शेख म्हणाले की, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजाचा फक्त मतांसाठी वापर करण्यात आला. तर युवकांना कार्यकर्ते बनवून एकमेकांना भिडवण्याचे काम केले गेले. युवकांना रोजगार महत्त्वाचा असून, युवकांच्या हाताला काम नाही.
अशा बेरोजगार युवकांना धार्मिक भावना भडकावून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नईम शेख यांनी जातीयवादी प्रवृत्तीशी लढण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. मागासलेल्या समाजातील युवकांना दुर्लक्षित ठेवण्याचे काम चालू आहे.
डॉ. राजेंद्र गवई यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण या पक्षात प्रवेश करीत असून, भविष्यात युवकांची मोठी फळी उभी करणार असल्याची भावना नूतन पदाधिकार्यांनी व्यक्त केली.