Ahmednagar News:पारनेर तालुत्यातील पळशी येथे २०१६ मध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल लागल आहे. सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्याच गावातील आरोपी पोपट शंकर साळवे याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा देण्यात आली.
यातील आरोपी साळवे हा पीडित मुलीच्या वडिलांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करत होता. ८ ऑक्टोबर २०१६ रोजी त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्या आजोबांच्या शेतात नेले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
या घटनेमुळे पारनेर तालुक्यामध्ये संतापाची लाट पसरली होती. ग्रामस्थांनी पारनेर बंदची हाक दिली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकरणामध्ये लक्ष घातले होते. या खटल्यात मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नेमणूक करण्यासंबंधी पाठपुरावा केला होता.
त्यानुसार ऍड यादव-पाटील यांची या प्रकरणात नियुक्ती झाली होती.सरकार पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष, घटनास्थळ पंचनामा, घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तू,
त्याचप्रमाणे आरोपीच्या अंगावर आढळून आलेली घटनास्थळावरील मातीचा डाग, रक्ताचा डाग आणि इतर वस्तुस्थितीजन्य पुरावयाची भक्कम साखळी न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांनी काम पाहिले होते.