जिल्ह्यातील या बहुचर्चित पोलीस अधिकाऱ्याची झाली बदली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-  गुटखा प्रकरणी केलेली कारवाईमुळे चर्चेत आलेले श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांची नुकतीच बदली करण्यात अली आहे.

त्याचबरोबर नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अनुक्रमे प्रशिक्षक आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी आणि अभिनव त्यागी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी गुटखा छापा प्रकरणातील मुख्य आरोपींच्या तपासात पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट यांना अपयश आले.

तसेच चार पाच दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरात मटका सर्रासपणे चालू असल्यामुळे नाशिक पोलीस महासंचालकांच्या पथकाने श्रीरामपुरात येऊन अनेक ठिकाणी छापा टाकला.

अशा काहि प्रकरणामुळे बहिरट यांची बदली होईल अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे त्यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली असावी अशी चर्चा सुरु होती.

त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी आयुष नोपाण हे कार्यभार स्विकारणार आहेत. पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट तसेच रणजित डेरे यांची बदली नगर येथे कंट्रोलला करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24