या सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्याने सदस्याला दिली धमकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-सरकारी कार्यालये म्हंटले कि सिनिअर ज्युनिअर यांच्यातील वाद हा आलाच. अनेक ठिकाणी आपल्या पदाचा वापर करत आपल्या ज्युनिअर कर्मचाऱ्यांना कमी लेखण्याचे काम वरिष्ठांकडून केल्याचे

अनेक घटना तुम्ही ऐकल्या तसेच पहिल्या देखील असतील. इथे एका वरिष्ठाने चक्क एका सदस्याला चक्क धमकी दिली. याबाबत समजलेली माहिती अशी कि,

राहुरी तालुक्‍यातील कृषी अधिकारी महेंद्र ठोकळ यांनी कृषी सहायक संघटनेचे माजी राज्याध्यक्ष व विद्यमान राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ भास्कर यांना शिवीगाळ केली.

या घटनेचा निषेध करत येथील कृषी सहायक संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले. तसे निवेदन नुकतेच उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांना देण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24