विद्यापीठाच्या अहमदनगर उपक्रेंद्राच्या नूतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा ! विद्यार्थी सुविधा केंद्रा’मुळे सवा लाख विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपक्रेंद्राच्या नूतन इमारतीचे उद्धाटन रविवारी दि. ३ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

अहमदनगर येथील बाबुर्डी घुमट येथे बांधण्यात आलेल्या या इमारतीचे उद्धाटन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यपदी कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी राहणार असून खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्र – कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, आमदार मा. श्री. संग्राम जगताप, आमदार श्री. निलेश लंके, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, अहमदनगर उपकेंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी, आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

१८,००० स्के. फु. जागेवर बांधण्या आलेल्या या नूतन इमारतीमुळे जिल्याह्यातील सवा लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. याठिकाणी ‘विद्यार्थी सुविधा केंद्रा’ची निर्मिती करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना आता विविध शैक्षणिक कामासाठी पुणे कॅम्पसमध्ये येण्याची गरज नाही.

या कक्षामार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, विविध प्रमाणपत्रांचे अर्ज स्विकारणे, परीक्षेच्या निकाल पत्रातील दुरूस्ती संदर्भात अर्ज स्विकारणे, सुधारीत निकाल पत्र देणे तसेच विद्यापीठात असणाऱ्या विविध शैक्षणिक कार्सेसची माहिती या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासाठी सॉफ्ट स्कील्स सारखे प्रशिक्षणाचे कार्यक्रमही याठिकाणी राबविण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अहमदनगर उपकेंद्र व उच्च तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांचेतर्फे १००० विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन प्लेसमेंट करणार आहेत.

यासह विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरु करण्यात येणार असुन त्यासाठी प्रत्येकी ३० कोटींचे नियोजन आहे. या कार्यक्रामात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे, श्री. रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्रा. डॉ. धोंडीराम पवार,

श्रीमती बागेश्री मंठाळकर, श्री. सागर वैद्य, प्रा. डॉ. संगीता जगताप, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. डॉ. सुदर्शन कुमार, अहमदनगर उपकेंद्र समिती सदस्य श्री. अमित कोल्हे, डॉ. राजधर टेमकर, प्रा. डॉ. जयश्री सिनगर, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. प्रदीप दिघे, डॉ. बाळासाहेब सागडे,

डॉ. युवराज नरवडे, श्री. सचिन गोर्डे पाटील, श्री. अमोल घोलप, बाबुर्डी घुमटच्या सरपंच सौ. नमिता पंचमुख, उपसरपंच सौ. ज्योती परभाणे आदी उपस्थित राहणार आहेत.