नवदाम्पत्यांनी वृक्षरोपणाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शेंडी-पोखर्डी (ता. नगर) नगर- औरंगाबाद रोड येथील साईमुरली लॉन्स मध्ये झालेल्या लग्नात वधू-वरांनी वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. निमगाव वाघा (ता. नगर) येथील अतुल फलके यांचा विवाह शेंडी येथील अनिता निमसे यांच्याशी पार पडला.

यावेळी स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या वृक्षरोपण व बीजरोपण उपक्रमांतर्गत नवदाम्पत्यांच्या हस्ते वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तसेच वर्‍हाडी पाहुण्यांच्या हस्ते देखील झाडे लावण्यात आली. फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन हा विवाह सोहळा झाला.

यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, वसंत फलके, भाऊसाहेब फलके, सुभाष जाधव, अंबादास जाधव, रामा पवार, सागर फलके, अरुण अंधारे, किरण जाधव, सुभाष जाधव, सचिन कापसे, बाबासाहेब फलके, संतोष फलके, साहेबराव बोडखे, अजीत फलके,

सोमनाथ फलके, शिरीष फलके, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, साहिल निमसे, मयुर काळे आदि उपस्थित होते. जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल, निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे.

पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असून, संस्थेच्या वतीने एक हजार झाडे लावण्यात आली आहे. ही झाडे जगविण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

तर विविध भागात बीजरोपण देखील करण्यात आले असल्याचे पै.नाना डोंगरे यांनी सांगितले. तर जन्म, वाढदिवस, विवाह, मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच सण, उत्सव काळात वृक्षरोपण करुन ही चळवळ व्यापक करण्याचे त्यांनी आवाहन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24