अहमदनगर बातम्या

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाबाबत पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाला जवळपास दोन महिने उलटून गेली तरीदेखील पदभार स्विकारण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येतेय.

राज्य सरकारला विश्वस्त मंडळात रस नसल्याचे यातून दिसून येत असून नुकतेच उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य शासनाच्यावतीने 14 डिसेंबरपर्यंत न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितला आहे.

पुढील सुनावणी 14 डिसेंबरला होणार आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या नवीन विश्वस्त मंडळाला अपूर्ण विश्वस्त संख्येमुळे पदभार स्वीकारण्यास औरंगाबाद खंडपीठाने मनाई केली आहे.

दि 28 ऑक्टोंबर 2021 रोजी शासनाच्यावतीने शपथपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये उर्वरित विश्वस्त नियुक्ती करण्यासाठी वेळ मागितला होता, तोपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत तदर्थ समिती कामकाज बघणार असल्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले होते.

दरम्यान दि. 17 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाच्या वकिलांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे कारण सांगत अजून वेळ वाढवून मागितला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून घेत शासनास 14 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ? जाणून घेऊया…

या विश्वस्त मंडळात 17 जणांची विश्वस्त म्हणून निवड करणे गरजेचे आहे. मात्र सध्या महाविकास आघाडी सरकारकडून या विश्वस्त मंडळावर नूतन विश्वस्त मंडळ नियुक्त केलेली संख्या ही पदसिद्ध यांच्यासह बारा आहे

त्यामुळे अपूर्ण सदस्य संख्येस संस्थानचे कामकाज करण्यास परवानगी देणे म्हणजे न्यायालयाचा कसूर ठरेल. म्हणून या अपुर्‍या संख्या असलेल्या सदस्यांना पदभार स्वीकारण्यास खंडपीठाने मनाई केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office