अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- राज्यात एकीकडं कोरोनाची आकडेवारी घटत असताना मात्र एकट्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसून येत आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
यातच संगमनेर पाठोपाठ आता राहता तालुक्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. नुकतेच राहाता तालुक्यात मंगळवारी 64 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 51 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
तर 331 अॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात आतापर्यंत 24334 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 24024 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
मंगळवारी खासगी रुग्णालयात 53 तर अँटीजन चाचणीत 11 असे एकूण 64 नवीन रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढताना दिसून येत आहे.
यामुळे प्रशासनाने देखील यावर उपाययोजना म्हणून कठोर निर्बंध लागू करण्याचे निर्देश गावपातळीवर दिले आहे. यातच वर्षाचे सण अवघ्या काही दिवसांवर आले असल्याने नागरिकांची गर्दी वाढू शकते. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.