अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह कोरोना योद्धा देखील या महामारीच्या विळख्यातून सुटलेले नाही. दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत असल्याचे दिसू लागले होते.
त्यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तालुक्यात काल नवीन 20 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तीन हजारांच्या पार गेला आहे. सध्याच्या स्थितीला तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 109 झाली आहे.