शेतकऱ्यांना दिलेले बियाणे त्या अधिकाऱ्याने पुन्हा मागवून घेतले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- गेल्या आठवड्यात सहाय्यक कृषी अधिकारी जाधव यांनी दशमी गव्हाण येथील सुमारे काही शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक साठी असणाऱ्या हरभऱ्या बियाण्याचे वाटप केले.

मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ते वाटप केलेलं बियाणे पुन्हा जमा करण्याचे आदेश दिले. वाटप केलेल्या हरभरा बियाणे पुन्हा मागवल्याने शेतकऱ्यांमध्ये तर्कवितर्क सुरु झाले. याबाबत कोणालाही पुर्वकल्पना देण्यात आली नव्हती.

अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार यापुर्वी जे बियाणे वाटप केले त्याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी सोशल मिडियाचा वापर करुन ती माहिती लोकांपर्यंत पोहचवली व नागरिकांनी संपर्क करुन ती यादी नियमानुसार बनवण्यात आल्याच सांगण्यात आल.

पहिली यादी नियमानुसार असताना सहाय्यक कृषी अधिकारी यांनी बियाणे वाटप केलेल्या तिसऱ्या दिवशी पुन्हा शेतकऱ्यांना बियाणे ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचे आदेश का दिले असा सवाल यानिमिताने उपस्थित होतो.

या प्रकारामुळे सहाय्यक कृषी अधिकारी जाधव यांनी मनमानी कारभार सुरू केला असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर काही दिवसानंतर 27 ऑक्टोंबर रोजी कृषी अधिकाऱ्यांनी पुन्हा लकी ड्रॉ द्वारे हिच बियाणे शेतकऱ्यांना वाटप केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24