अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- ज्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवत ‘सात फेरे’ घेतले. त्यानेच तिला फिनाईल पाजल्याचा प्रकार नगर शहरातील स्टेशनरोड वरील एका सोसायटीत घडला आहे.
या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर शहरातील स्टेशनरोड वरील एका सोसायटीत राहणाऱ्या पीडित विवाहितेला सासरच्यांकडून आपणास वारंवार शिवीगाळ मारहाण होत असत.
दरम्यान कपडे धुण्याच्या कारणावरून पतीने मारहाण करत मला जमिनीवर पाडले. त्या वेळी सासू-सासर्यांनी माझे पाय पकडून ठेवले. यावेळी पतीने माझ्या तोंडामध्ये फिनायल टाकून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
अशी तक्रार उपचार सुरू असलेल्या विवाहितेने कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी विवाहितेचा पती, सासु, सासरा या तिघांवर गुन्हा दाखल केला असून कोतवाली पोलिस पुढील तपास करत आहेत.