अहमदनगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे फक्त ….वाचा काय म्हणाले गडकरी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या अनेक कामांना मंजूरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात होत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण सोहळा पार पडला.

या वेळी गडकरी बोलताना म्हणाले सुरत- चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग नगरमधून जाणार असल्याने अहमदनगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. फक्त या रस्त्यासाठी गौण खनिजासाठी रॉयल्टी महाराष्ट्र सरकारने माफ करावी. त्यासाठी लवकरच महाराष्ट्र सरकारसोबत बैठक होणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाघोली-शिरूर या मार्गावर थ्री लेअर (तीन मजली) पूल-रस्ता करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. आठ महामार्गांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी अहमदनगर येथे त्यांनी ही घोषणा केली. यासोबतच औरंगाबाद-अहमदनगर आणि तळेगाव-चाकणही उड्डाणपुलाने जोडण्याची घोषणा केली.

कोपरगाव-सावळी विहिरी, तळेगाव-चाकण-श्रीगोंदा-पाटोदा, जामखेड-सौताडा या नवीन मार्गांचीही गडकरी यांनी घोषणा केली. यामुळे नगरच्या विकासात मोठी भर पडणार आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. रोहित पवार, आ. बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, अंकूश काकडे, राजश्री घुले,

आ.निलेश लंके, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, राम शिंदे, आ.लहामटे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, राजेंद्र क्षीरसागर, एस पी मनोज पाटील उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe