अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गेली अनेक महिने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होता, या संकटाला सामोरे जात त्याच्यावर विजय मिळवत असताना नगरकरांच्या समोर आणखी एक मोठे संकट येऊन उभे राहिले आहे.
देशात बर्ड फ्ल्यू या आजराने प्रवेश केला आहे, तसेच स्वाईन फ्ल्यूमुळे देखील अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकतेच राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे मृत कावळा आढळल्याने लोणीकरांची चिंता वाढली असून मृत कावळ्याचा नमुना स्वाईन फ्लूच्या तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला आहे.
लोणी बुद्रुक गावातील सादतपूर रस्त्यालगत जालिंदर रामनाथ विखे यांचे राहते घर आहे. घराजवळ रात्री जालिंदर विखे यांना एका झाडाखाली एक कावळा मृतावस्थेत दिसून आला.
सध्या स्वाइन फ्लूने कावळे व अनेक पक्षी मृत होत असल्याने त्यांनी लोणीचे शासकीय पशुवैद्यक डॉ. दशरथ दिघे व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. बुधवारी सकाळी हे दोघे घटनास्थळी गेले.
मृत कावळा बर्फाच्या पॉलिथिन बॅगमध्ये पॅक करून स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पुढील तपासणीसाठी त्याचा नमुना भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे.