अहमदनगर बातम्या

आई – वडिलांनीच अल्पवयीन मुलीला शिवीगाळ,मारहाण करत लावला विवाह … मात्र

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : प्राचीन काळात काही त्या काळातील आवश्यकतेनुसार परंपरा आणि रीतीभाती तयार करण्यात आल्या होत्या. परंतु वर्तमान काळात अजूनही बाल विवाह सारख्या कुप्रथा देशात आहेत.

ही वाईट प्रथा थांबवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मुलींना शिक्षण देणे. मुली जेव्हा शिकू लागतील तेव्हा त्या स्वतः बालविवाहाला नाकारतील. त्यामुळे मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे.

मात्र अनेकदा बालविवाह करण्यास मुलीला तिचे आईवडिलच कारणीभूत ठरतात. असाच प्रकार नगर जिल्ह्यात समोर आला आहे. ज्यात अवघ्या १५ वर्षे ११ महिने वय असणाऱ्या मुलीला तिच्या आई – वडिलांसह चौघांनी शिवीगाळ, मारहाण करून तिचा बळजबरीने विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

ती नेवासे तालुक्यातील एका गावात राहणारी आहे. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतात कायदेशीर विवाहासाठी मुलासाठी २१ वर्षे आणि मुलीसाठी १८ वर्षे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. लहान वयात मुलांची लग्ने झाल्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिक विकासावर आणि आनंदी जीवनावर परिणाम होतो. लहान वयात लग्न केल्याने संपूर्ण समाजात मागासलेपणा येतो. जी शेवटी समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरते.

नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्या आई – वडिलांसह चौघांनी शिवीगाळ, मारहाण करून तिचा बळजबरीने विवाह लावून दिला. याप्रकरणी नगर तालुक्यातील कापुरवाडी येथील ग्रामसेवक सारीका प्रकाश डोळसे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून पीडित मुलीच्या आई, वडिलांसह इतर तीन नातेवाईक अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. मुलगी अल्पवयीन असूनही तिच्या आई, वडिल व इतरांनी तिला शिवीगाळ, मारहाण करून तिच्या इच्छेविरुध्द ३० जून रोजी कापुरवाडी येथे तिचा विवाह लावून दिला.

ग्रामसेवक सारीका डोळसे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आई, वडिल व मुलासह त्याच्या आई व वडिलांविरूध्द फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. अधिक तपास अंमलदार नगरे रे करत आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे प्रकार रोखण्यासाठी सामाजिक संस्थांनी प्रयत्न केल्याने असे प्रकार कमी झाले आहेत.

मात्र तर आता आई वडिलच जर बालविवाह करण्यासाठी मुलींवर जबरदस्ती करत असतील तर मुलींनी कोणाकडे दाद मागायची असा सवाल उपस्थतीत केला जात आहे.

 

Ahmednagarlive24 Office