अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथुन शिरुर (बीड) येथे एसटीबसने प्रवास करताना बॅगमधे ठेवलेले पंधरा तोळे सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्याने चोरुन नेले.
विवाह समारंभासाठी उपस्थीत राहुन गावी परतणाऱ्या महिलांच्या दागिन्यांची चोरी कधी झाली हे त्यांनाही कळले नाही. शाहाबाई भीमराव जायभाय यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शाहाबाई जायभाये (रा.गोमाळवाडा,ता. शिरुर जिल्हा.बीड) या घोडेगाव येथुन नगर व तेथुन पाथर्डी मार्गे शिरुर कासार असा दि.२३ डिसेंबर २०२० रोजी दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत एसटीबसने प्रवास केला.
त्यांनी जवळ असलेल्या बँगमधे सोन्याचे दागीने काढुन ठेवले होते. प्रवासात नेमके कुठे व कोणी के काढुन घेतले हे जायभाय यांना समजले नाही. घरी गेल्यानंतर पाहीले असता दागीने चोरीला गेल्याचे समजले.
यामधे पाच तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे,चार तोळे सहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार,पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण ,
एक तोळा दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे झूबे असा सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. जायभाये यांनी पाथर्डी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिस तपास करीत आहेत.