अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा येथीक खाजगी कोविड सेंटरकडून सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट चालू असल्याचा आरोप करुन सदर कोविड सेंटर चालविणार्या खाजगी हॉस्पिटलवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोेपे यांना पाठविण्यात आल्याची माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी दिली. नेवासा तालुक्यातील भेंडा येथे एका खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटर कडून रुग्णाने बील न भरल्याने त्याला डिस्चार्ज देऊन देखील दोन दिवस डांबून ठेवण्यात आले असून,
रुग्णांच्या नातेवाईककडून जास्तीच्या पैश्यांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार घडला असल्याचे संघटनेचे म्हणने आहे. रेणुकानाथ रामजी भवार यांची शिर्डी येथे कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र भेंडा येथे सदरील खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटर मध्ये त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार भरती करण्यात आले.
सात दिवसाच्या उपचारानंतर त्यांच्या कुटुंबीयांना 1 लाख 21 हजारचे बिल देण्यात आले. याची विचारणा त्यांचा मुलगा लक्ष्मण पवार यांनी केली असता कोविड सेंटरच्या कर्मचारींनी त्यांना धक्काबुक्की करून बाहेर हाकलून दिले. पेशंटचा डिस्चार्ज होऊन देखील बिल न भरल्याने दोन दिवस त्यांना डांबून ठेवण्यात आले.
पुर्ण बिल भरल्याशिवाय रुग्णाला सोडणार नसल्याची आडमुठी भूमिका कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी घेतली. यामुळे रुग्णाला मोठा त्रास सहन करावा लागला. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची हॉस्पिटलकडून आर्थिक व मानसिक पिळवणूक झाली असून, सदर घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
शिर्डी येथे कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सदर रुग्णाची भेंडा येथील खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरने कोरोना चाचणी पॉझिटिव्ह दाखवली. मात्र तो चाचणी अहवाल कुटुंबीयांना देण्यास टाळाटाळ केली. सदर खाजगी कोविड सेंटरने रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणण्यासाठी जास्तीचे पैसे भरून घेतले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved