नगरचे सुपूत्र असलेले तिन मंत्री कुठे आहेत हेही जनतेला माहीत नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हयाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी केला आहे. नगरचे सुपूत्र असलेले तिन मंत्री शहरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबददल भाष्य करताना दिसत नाहीत.

ते कुठे आहेत हेही जनतेला माहीत नाही. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेही नागरीकांना मदत करताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हयातील मंत्रयांनी आणि सरकारनेही कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जबाबदारी स्वीकारावी अशी टीका विखे यांनी केली

आहे. पालमंत्रयांना जिल्हयाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. ग्रामपंचायतमध्ये मागच्या दाराने बगलबच्चे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यातच त्यांचा सगळा वेळ जात आहे.

त्यांचा हा डाव मात्र न्यायालयाने हाणून पाडला. हे सरकार म्हणजे तीन तिघाडा आणि काम बिघाडा असल्याची टाकाही विखे यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24