Ahmednagar News : विरोधी गटाच्या उमेदवाराचे कार्यकर्ते मला गोळ्या घालण्याची भाषा करत आहेत जर कार्यकर्त्यांची अशी भाषा असेल तर यांनी दिलेला उमेदवार कशा वृतीचा असेल, याची प्रचिती पारनेर तालुक्यातील जनतेला आली असून, पारनेर तालुक्यातील जनता या माणसाला वैतागली असल्याचा घणाघात खासदार सुजय विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडीच्या उमेदवारासह त्यांच्या कार्यकत्यांनाही त्यांनी चांगलेच सुनावले.
मागील पन्नास वर्षात विखे कुटुंबाने जनसामान्यांची मने जिंकली. अनेक लाटा पाहिल्या आणि उलथूनही लावल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाथर्डी तालुक्यातील मिरी व तिसगाव या ठिकाणी भाजपा बूथ प्रतिनिधींची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले,
आमदार मोनिकाताई राजळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अंकुश चितळे, मार्केट कमिटीचे चेअरमन सुभाष बर्डे, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, सुनील परदेशी, युवानेते कुशल भापसे,
संचालक वैभव खलाटे, जिजाबापू लोंढे, अरुण रायकर. माजी सरपंच संतोष शिंदे, सरपंच चारुदत्त वाघ, अँड वैभव आंधळे, पृथ्वीराज आठरे, संभाजी वाघ, महादेव पाटील कुटे, डॉक्टर बबनराव नरसाळे, डॉक्टर नंदकिशोर नरसाळे, साहेबराव गवळी, अण्णासाहेब शिंदे,
कारभारी गवळी, एकनाथ झाडे, संजय नवल, माजी सरपंच आदिनाथ सोलाट, उपसरपंच संजय शिंदे, दिलीप कुरे, सुभाष गवळी, पोपटराव कराळे, सरपंच गणेश पालवे, विष्णू पालवे, प्रदीप टेमकर, रामकिसन वांढेकर, तुकाराम वांढेकर, सुधाकर वांडेकर, दिलीप वांढेकर, शिवसेना तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, माजी सरपंच सचिन नेहुल, आबासाहेब काळे, सुनील लवांडे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. विखे पाटील म्हणाले, मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात नजरेत भरतील, अशी विकास कामे केली. मागील पन्नास वर्षात विखे कुटुंबाने अनेक लाटा पाहिल्या आणि उलथूनही लावल्या. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा कोणतीही लाट नाही.
दीड महिन्यात कुणीतरी गरीब श्रीमंताच्या नावाखाली भावनिक लाट तयार करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा लाटा सर्व कार्यकर्त्यांनी थप्पीला लावण्याचे आवाहन खासदार विखे यांनी केले. कार्यकर्त्यांनी आपण केलेली विकास कामे केंद्र आणि राज्य सरकारने राबवलेल्या योजना सक्षमपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा. प्रत्येक गावात विरोधकांकडून विश्लेषक नेमले आहेत.
या विश्लेषकापासून सावध रहा वातावरण गढूळ करण्याचे काम हे विश्लेषक चावडीवर बसून करत आहेत. युट्युब सोशल मीडिया वर लक्ष न देता केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील पाच वर्षात व राज्य सरकारच्या माध्यमातून मागील दीड वर्षात आपण केलेला विकास लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी केले.