अहमदनगर बातम्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळे येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा निर्घृणपणे खुन करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ शारदा लगड यांनी केली आहे.

अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन नराधमांनी तिचेवर अत्याचार करुन तिचा निर्घृणपणे खुन केला.पोलिसांनी अशा संवेदनशील प्रकरणात तात्काळ तपास करुन यातील नराधमां विरुद्ध आरोपपत्र न्यायालयात पाठवावे.

आणी हा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी अॅड.शारदा लगड यांनी राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी भक्कमपणे फिर्यादीच्या मागे राहिल. या निवेदनाच्या प्रती महिला आयोगाच्या अध्यक्षा, पोलीस अधीक्षक डॉ मनोज पाटील व पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक.शाम बळप यांना पाठवल्या आहेत.

तसेच औरंगाबाद जिल्ह्यातही महीलांवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक व्हावी.या घटनेचा देखील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तीव्र निषेध करते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office