जोधपूर येथील अत्याचार करुन हत्या करणार्‍या नराधमांना फाशी द्यावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- हाथरस बलात्काराच्या घटनेसारखीच भयंकर घटना जोधपूर येथील लोहावर गावामध्ये घडली असून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिल्याची संताप जनक घटना घडली आहे .

या घटनेचा निषेध करीत गुन्हेगारांना अटक करून त्यांना फाशी द्यावी असे निवेदन वैष्णव बैरागी विकास फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना देण्यात आले. यावेळी वैष्णव बैरागी विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. अहमदनगर जिल्हा युवा अध्यक्ष उमेश तिवारी, जिल्हा सचिव जयदीप तिवारी,

सहसचिव ओमकार पांडे, सहकोषाध्यक्ष रवींद्र पांडे, सहसंघटक सागर बैरागी, माणिकदास बैरागी, संतोष बैरागी, हेमंत पांडे, धनंजय बैरागी, शितल तिवारी, सिमा तिवारी, आदींसह समाज बांधव उपस्थित होते. 21 सप्टेंबर रोजी जोधपूर येथील लोहावर गावाचे रहिवासी असलेल्या एका कुटुंबातील 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.

अत्याचार करणार्‍या संशयितांनी या मुलीची हत्या आत्महत्या वाटावी आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देत घटनास्थळावरून पळ काढला असल्याची गावात चर्चा सुरु आहे. या घटनेबाबत जोधपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून

पोलिसांचा तपास संथ गतीने सुरु असल्याबाबत जोधपूर येथील वैष्णव बैरागी समाजाने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना निवेदन देत तपासाला गती देऊन गुन्हेगारांना गजाआड करून न्याय देण्याची मागणी केली आहे . एकीकडे भारतात बेटी पढ़ाव, बेटी बचाव’ चा नारा दिला जात आहे.

आणि दुसरीकडे भारताच्या बहुसंख्य ठिकाणी मुलीवर सामुहिक बलात्कार करून त्यांना अमानुषरित्या मारुन टाकण्यात येत असल्याच्या दुर्दैवी घटना घडत असल्याने वैष्णव बैरागी विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने निषेध करण्यात आला.

तसेच सदर घटनेचा लवकरात लवकर तपास लावुन करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांना निवेदन देण्यात आले . या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी,राजस्थानाचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24