अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- शहरातील कापड बाजार घास गल्ली येथे महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या ड्रेनेज व पाईपलाइनचे काम सुरु आहे. मात्र काही दिवसांपासून रस्त्यावर खड्डे खोदून हे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे.
रस्त्यावर खड्डे तसेच उघडे असून, त्यालगत मातीचे व गाळचे ढिगार तसेच सोडून देण्यात आले आहे. यामुळे येथील नागरिकांसह बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
येत्या दोन दिवसात सदर काम सुरु न केल्यास समाजवादी पार्टीच्या वतीने महापालिका कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी दिला आहे.