पोलिसांनी वेषांतर केले आणि त्या खतरनाक टोळीस गजाआड केले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-ओंकार भालसिंग खून प्रकरणातील मुख्य आरोपी विश्वजीत रमेश कासार (आंबराईवाडी, वाळकी, ता. नगर) व त्याच्या तीन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले.

नगर तालुक्यातील वाळकी गावात नोव्हेंबर २०२० मध्ये हे खून प्रकरण घडले होते. पोलिसांनी वेषांतर करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृृृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली,

की या खून प्रकरणातील आरोपी कासार वाघोली (पुणे) इथल्या श्रध्दा हाॅटेल येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करत सापळा रचला. आरोपी कासार येताच त्याला जेरबंद केले गेले.

त्याची चौकशी केली असता त्याला आश्रय देणाऱ्या मयूर बापूसाहेब नाईक (वाळकी), भरत भिमाजी पवार (साकत खुर्द, ता. नगर), संतोष धोत्रे (कारेगाव, शिरुर) यांना जेरबंद केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24