अहमदनगर बातम्या

पोलिसांना फोन आला… आताच गेला तर तो भामटा लगेच सापडेल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरासह भिंगार परिसरात घरफोडी व दुचाकी चोरीचे सञ सुरुच होते.

यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण झाले असतानाच भिंगार कॅम्प पोलीसांनी घरफोडी, दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा पकडण्याची दमदार महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहत्या घरासमोर बसलेले असताना मालक मनोज पगारे यांचे बंगल्याचा समोरच्या दरवाज्याचे कुलूप दिलीप शिंदे नामक इसम पहारीने तोड़ीत असताना एकाने पाहीले व जोराने ओरडला असता सदरचा इसम पळून गेला.

सोनू संजय कांबळे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी शिंदे हा बेलेश्वर मंदीर परिसरात आला आहे, अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली.

पोलीस पथकाने बेलेश्वर मंदीर परिसरात सापळा लावला. तेथे एक इसम पायी फिरताना मिळून आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे दिलीप उर्फ किरण दत्तात्रय शिंदे (वय 27 वर्षे रा. नागरदेवळे ता. जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्यास गुन्हयाचे अनुषंगाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यास फिर्यादीने ओळखले.

आरोपी शिंदे याला अटक केली. यानंतर त्याला न्यायालायासमोर उभे केले असता, न्यायालायाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Ahmednagarlive24 Office