पोलीस उपअधीक्षक संदीप मिटकेंवर गोळीबार करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यास अटक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासमोर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये सुदैवाने उपाधिक्षक बालंबाल बचावले आहेत.

राहुरी येथे मागील काही दिवसांपूर्वी पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे यांच्या विरुद्ध ३० सप्टेबर रोजी एका महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .

सदरच्या गुन्ह्याबाबत पीडित महिलेने जबाब दिल्यास आणखी अडचणी निर्माण होण्याची भीती पोलीस अधिकारी लोखंडे यांच्या मनात निर्माण झाली त्यामुळे लोखंडे यांनी आज सकाळी पीडितेच्या घरात घुसून त्याच्याजवळील बंदूक पीडित महिला व त्याच्या दोन मुलीवर ताणली .

याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने लोखंडे यांनी हवेते गोळी झाडली

त्यानंतर चर्चेतून मार्ग काढू असे सांगून पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस लोखंडे यांच्या बंदुकीच्या निशाण्यावर असलेल्या मुलींना त्यांच्या ताब्यातून सुखरूप बाजूला काढले यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी लोखंडे त्यांच्यावर झडप घातली

त्यावेळी लोखंडे यांनी मिटके यांच्यासमोर गोळी झाडली , सुदैवाने बंदुकीतून सुटलेली गोळी ची दिशा चुकविल्याने मोठा अनर्थ टळला आहे यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी लोखंडे यास ताब्यात घेतले असून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे

या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ अटक केली आहे.या निलंबित एपीआयवर या पूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. या घटनेची माहिती मिळताच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री.बी.जी.शेखर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व नगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.