अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या काळात राज्यात बालविवाहाचे घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याची धक्कादायक आकडेवारी नुकतीच समोर आली होती. दरम्यान अशाच काहीश्या घटना नगर जिल्ह्यातही घडत असल्याच्या निदर्शनास येत आहे.
एका जागरूक नागरिकांच्या समय सूचकतेमुळे आगडगाव येथे सुरु असलेला एका बालविवाह नुकताच पोलिसांनी रोखला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी दुपारी चाईल्डलाईनच्या १०९८ हेल्पलाइन क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले की, अर्ध्या तासात आगडगाव येथे बालविवाह होणार आहे.
यावेळी चाईल्डलाईनच्या सदस्यांनी तत्काळ याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. यावेळी चाइल्डलाइन टीमसोबत पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मंडपात मंगलाष्टके सुरू होती. पथकाने बालवधूचे समुपदेशन करत तिला धीर दिला. त्यानंतर तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
यावेळी वधू-वरांच्या पालकांकडून मुलीचा विवाह हा १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तिचा इच्छेनुसार केला जाईल, असे लेखी घेतले. व हा बालविवाह रोखला.