अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना हक्काची घरे मिळावीत याकरिता तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्याला अनुसरून नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरासह जिल्ह्यातील 1790 घरांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
शहरामध्ये पोलीस मुख्यालय मध्ये साडेपाचशे घरांचा नव्याने प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे शिर्डी येथे अतिरिक्त घरे द्यावीत, हा विषय आहे.
तर नेवासा, संगमनेर, कर्जत या ठिकाणी सुद्धा घरे बांधण्याचा विषय आहे. यामध्ये 62 पोलिस अधिकार्यांनी सुद्धा निवासस्थान बांधायचे आहे.
एकूण जिल्ह्यामध्ये 1790 घरे बांधण्याचा प्रस्ताव असून तो सादर करण्यात आलेला आहे, असेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान गेल्या काही वर्षापासून पोलिसांना आपल्या हक्काची घरे मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून विचार विनिमय सुरू होता. आता या ठिकाणी नव्याने घर बांधण्याचा विषय हाती घेण्यात आला आहे.
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली पाहिजेत. या दृष्टिकोनातून तात्काळ प्रस्ताव सादर करा, असे निर्देश देण्यात आले होते.