अहमदनगर बातम्या

राष्ट्रवादीमध्ये येणाऱ्यांची राजकीय जबाबदारी आमची : आ. नीलेश लंके !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  नगर-पारनेर मतदार संघामध्ये आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून खारेकर्जुने ते हिंगणगाव रस्ता सुधारणा करणे, निमगाव वाघा ते कापसे वस्ती रस्ता सुधारणा करणे,

बाबुर्डी घुमट येथे लहान पुलासह रस्ता बांधकाम करणे, बाबुर्डी गावा अंतर्गत रस्ता करणे, अस्तगाव धोकटी ते आमले वस्ती रस्ता सुधारणा करणे, सारोळा कासार ते दरेमळा रस्ता सुधारणा करणे,

कामरगाव विठ्ठलवाडी रस्ता सुधारणे या कामांचा समावेश आहे. एवढेच नाही तर कामरगाव येथे नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या वास्तूचे असे दहा कोटीच्या कामाचा भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले.

यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, रावसाहेब शेळके, अनिल आंधळे, सरपंच तुकाराम कातोरे, अजय लामखडे, उपसरपंच प्रतीक शेळके,

अंकुश शेळके, संजय जपकर, संजय काळे, जयप्रकाश पाटील, वसंत ठोकळ, रावसाहेब साठे, नितीन कोतकर, संजय गेरंगे, अंकुश ठोकळ, भास्कर भोर, संतोष ढवळे, सिद्धांत आंधळे,

संदीप ढवळे, अशोक ठोकळ, श्यामराव आंधळे, राजू आंधळे व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात कामरगाव येथील तरुणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पिंपळगाव कौडा व भोयरे पठार येथील सरपंच सतीष ढवळे, बाबा टकले, संदीप लष्करे यांनी प्रवेश केला. वसंत ठोकळ यांनी मनोगत व्यक्त केले.

Ahmednagarlive24 Office