काहींचे तडजोडीचे राजकारण; दरेकर यांची राजेंद्र नागवडेंवर टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- तालुक्यातील नेते पक्षीय विचारांचे राजकारण सोडून स्वहितासाठी तडजोडीचे राजकारण करत आहेत. तडजोड करून आपली सत्ता केंद्रे शाबूत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,

अशी टीका काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी राजेंद्र नागवडेंचे नाव न घेता केली. वाईट अनुभव आल्यानंतर मी आता स्वाभिमानाची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यातील प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय संस्थेसाठी संघर्ष क्रांती संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे दरेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

दरेकर हे नागवडे समर्थक मानले जात. मागील वर्षी नागवडे भाजपमध्ये जाताना दरेकर यांनी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

आता नागवडे काँग्रेसवासी झाले. राज्यात भाजपची सत्ता गेल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच नागवडे काँग्रेसजवळ जात मंत्री थोरात यांच्या मांडीला मांडी लावून बसले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24