अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- कोल्हार बुद्रुक येथील मार्केट कमिटीसमोर नगर-मनमाड महामार्गावर खड्डे हुकविताना मालट्रकला आदळून चाकाखाली चिरडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला. प्रा. सुनील रामनाथ पठारे (वय ३५) असे या शिक्षकाचे नाव होते.
नगर-मनमाड महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या ममार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थांकडे अनेकदा लक्ष वेधले गेले आहे.
परंतु या ठिकाणी अनेक बळी जाऊनही प्रशासनास आणि लोकप्रतिनिधींस जाग आलेली नाही हे दुर्दैव. राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रा. सुनिल रामनाथ पठारे हे शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या
आयटीआय कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्राध्यापक होते. काल शनिवारी सकाळी चिंचोली येथून शिर्डीला कॉलेजमध्ये आपल्या दुचाकी (एमएच-17 सीके-6219) वर जात असताना कोल्हार
येथे नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे हुकविण्याच्या नादात ते एका मालट्रकच्या पाठीमागील भागावर जोराने आदळले. धडक बसल्याने त्यांची मोटरसायकल होलपटली. ते ट्रकच्या चाकाखाली सापडले. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने ते चिरडले गेले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved