कुकडी कारखाना 30 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सह. कारखान्याचे 17 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा नुकताच पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप म्हणाले की, मागील वर्षाचे राहिलेले शेतकर्‍याच्या उसाचे प्रति टन 500 रुपयांप्रमाणे पेमेंट येत्या 30 ऑक्टोबर अखेरपर्यंत शेतकर्‍याच्या खात्यात वर्ग करण्यात येतील.

चालू गळीत हंगामातील उसाला जास्तीत जास्त बाजार भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल. तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने शेवटपर्यंत कारखाना सुरू ठेवला जाईल.या बाबत शेतकर्‍यांनी कोणतीही काळजी करू नये असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा साखर संचालक घनःश्याम शेलार, कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन अनिल वीर, नगरपालिका अध्यक्ष गटनेते मनोहर पोटे आदी उपस्थित होते.

जीपीएस प्रणालीचा वापर :- ऊस वाहतूक करणार्‍या ट्रक, ट्रॅक्टर या वाहनांना आधुनिक पद्धतीची जीपीएस प्रणाली बसवून वाहतूक व वजन काटा प्रणाली अद्ययावत केली आहे. शेतकर्‍यांच्या उसाचे वजन व बील तत्काळ मोबाईल एप्लिकेशन्सद्वारे पाठविण्याचीही व्यवस्था केली असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24