आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्‍या लढ्यात लक्षवेधी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- राज्‍यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शिर्डी मतदार संघात कोरोना नियंत्रित ठेवण्‍यासाठी केलेल्‍या ए‍कत्रित प्रयत्‍नांमुळे कोरोना संकटाच्‍या लढ्यातील आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ आता राज्‍यात लक्ष वेधत आहे.

राज्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून वेळोवेळी प्रशासनाच्‍या मदतीने शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जागतीक पातळीवर कोरोना संदर्भातील करण्‍यात येणा-या उपाय योजना व सुविधांचा अभ्‍यास करुन तज्ञांच्‍या मदतीने एका नियोजीत पध्‍दतीने कोरोना मुक्‍तीसाठी प्रवरा पॅटर्नची आखणी केली.

यात सर्व्‍हेक्षण, तपासणी व रुग्‍णांवर उपचार या तीन बाबींकडे प्रामुख्‍याने लक्ष दिले. यात मतदार संघातील २४१ आशा सेविकांच्‍या माध्‍यमातून ५१ हजार ६६५ कुटुंबांचे आरोग्‍य सर्व्‍हेक्षण यशस्‍वीपणे पूर्ण केले. हे सर्व्‍हेक्षण करण्‍यासाठी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी इंन्‍फ्रारेड थर्मामिटर व ऑक्‍सीपल्‍स मिटरची उपलब्धता स्‍वखर्चाने करुन दिली.

सव्‍हेक्षण करणा-या आशा सेविकांबरोबरच आरोग्‍य आधिकारी, या विभागातील कर्मचा-यांनाही संरक्षण किट उपलब्‍ध करुन दिल्‍याने ८ दिवसात हे सर्व्‍हेक्षण पुर्ण झाले आहे.

हा आरोग्‍य पॅटर्न राबविताना प्रामुख्‍याने नागरीकांनी तपासणी करताना ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे प्रामुख्‍याने तपासली गेली. यामध्‍ये १६९ लोकांना असा त्रास दिसून आल्‍याने त्‍यांची पुढील तपासणी करण्‍यात आली.

कोरोना संकटानंतर १२४८ नागरीक हे बाहेरगावावरुन आले त्‍यांचीही आरोग्‍य तपासणी करुनच नियमाप्रमाणे विलगीकरण करण्‍यात आले. १५ फेब्रुवारी नंतर एकुण २७ लोक हे परदेशातून आले. त्‍यांचीही तपासणी आरोग्‍य विभागाने पुर्ण केली आहे.

एकुण ४ हजार २३४ नागरीक हे परराज्‍यातून आले. त्‍यांच्‍याही आरोग्‍य तपासणीचे काम पूर्ण झाल्‍याने आज मतदार संघात कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसण्‍याचे प्रमाणही कमी झाले आहे. अस्‍तगाव येथील २ नागरीकांचे पाठविण्‍यात आलेले नमुनेही निगेटीव्‍ह आल्‍याने आरोग्‍य विभागचे यश आता आधोरेखित झाले आहे.

कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर गावांमध्‍ये वेळोवेळी केलेल्‍या सुचनांचे पालन नागरीकांनी केले. लोकांच्‍या सहकार्याने गाव निर्जंतुकीकरण करण्‍यापासुन ते कुटुंबांच्‍या आरोग्‍य सव्‍हेक्षणापर्यंत झालेल्‍या कामामुळेच कोरोनाचे संकट रोखण्‍यात यश आले असले तरी संकटाचे सावट अद्यापही कायम आहे. यासाठी नागरीकांनी स्‍वत:बरोबरच कुटुंबांची काळजी घेणे, बाहेर गावावाहुन येणा-या नागरीकांच्‍या आरोग्‍य तपासणीसाठी जागृत राहणे गरजेचे आहे – आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24