कळपात घुसून भक्षक बिबट्याने शेळी केली फस्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात आरडगाव येथे रात्रीच्या वेळी बिबट्याने शेळ्या फस्त केल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने तातडीने पिंजरा लावल्याने बिबट्याचा मोठा धोका टळला आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्या शेळ्यांच्या वासाने आरडगाव येथील शेतकरी नामदेव तुकाराम हारदे यांच्या कळपात घुसला.

त्यांच्या वस्तीवरील चारपैकी एक शेळी फस्त करत बिबट्या शेजारील उसाच्या शेतात पसार झाला. या प्रकारची माहिती वनविभागाचे वनरक्षक यांना मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांनी शेळ्यांचा पंचनामा केला.

पिंजरा लावण्यात आल्याची महिती वनविभागाचे वनरक्षक भगवान परदेशी, कर्मचारी गोरक्षनाथ मोरे यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24