अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- काल शुक्रवारी राहाता बाजार समितीत 3808 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला 4500 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाच्या 6940 क्रेटसची आवक झाली.
कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 3900 ते 4500 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2750 ते 3850 असा भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 1500 ते 2700 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 2800 ते 3300 व जोड कांदा 300 ते 1500 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाची 6940 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 111 ते 150 इतका भाव मिळाला.
डाळिंब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये इतका भाव मिळाला.
डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.