विजयाचा गुलाल पडला महागात; पोलिसांनी दिला चोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात मोठ्या उत्साहात निवडणुका पार पडल्या. तसेच या निवडणुकांमध्ये अनेकांचा विजय झाला तर काहींना पराभवाची धूळ चाखावी लागली.

निवडणुकीतील विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देखील विजयी गुलालाची उधळण केली व आपला आनंद साजरा केला. मात्र हाच गुलाल त्यांच्या चांगलाच अंगलट आला.

राहुरी तालुक्यातील गणेगांव येथे विजयी मिरवणुकीत जेसीबी वरून गुलालाची मुक्त उधळण करीत विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यावर दंगल नियंत्रण पथकानेे लाठीमार केला असून ज्याच्या अंगावर गुलाल दिसेल त्याला चोप दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाने चांगला विंजय मिळविला. त्यामुळे उत्साही कार्यकर्त्यांनी जलोष साजरा केला.

हा आनंदोत्सव साजरा करत असताना पोलीस तेथे आले. त्यांनी मिरवणूक थांबावण्याची विनंती केली परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मन : स्थितीत नव्हते. ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे कानावर घातली गेली.

व काही वेळातच दंगल नियंत्रणे पथकाची गाडी तेथे आली. गुलाल दिसेल त्याच्यावर लाठ्या पडू लागल्या तरुण पळू लागले. दरम्यान घडलेल्या या प्रकारची दिवसभर तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24