जगभरातील साईभक्तांना शिर्डीला येणे होणार सोयीस्कर, काकडी विमानतळावरील नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : काकडी विमानतळाचे लोकार्पण नंतर प्रलंबित असलेला नाईट लँडिंगचा प्रश्‍न सुटल्याने काकडी व परिसरातील नागरिकांच्या व्यवसायाला गती मिळणार आहे. यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.

या यशाबद्दल काकडीकरांनी समाधान व्यक्‍त केले आहे. देशातील तसेच जगभरातील साईभक्तांना शिर्डीला येणे सोयीस्कर व्हावे व साईभक्तांचा वेळ वाचावा या उद्देशातून माजी आमदार अशोक काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्‍यातील काकडी येथे विमानतळ उभारण्यात आले होते.

या विमानतळाचे २०१७ साली लोकार्पण झाले. मात्र लोकार्पण झाल्यापासून या विमानतळावरून विमानांचे उड्डाणासाठी सातत्याने अनेक अडचणी येत होत्या. तसेच विमानतळावर डीव्हिओआर अर्थात कमी दृष्यमानतेवर मात करणारी “डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रॅंज’ हि सेवा बंद असल्यामुळे नाईट लँडिंग सुबिधा देखील बंद होती.

अशा अनेक अडचणींच्या गर्तेत काकडी विमानतळ सापडले होते. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे देश विदेशातील साईभक्तांना काकडी विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या.

कार्गो सेवा सुरू व्हावी, नाईट लँडिंग सुविधा सुरू व्हावी तसेच काकडी व परिसराचे प्रश्‍न सुटावेत यासाठी पाठपुरावा करुन सुमारे १५० कोटी निधी मिळविला आहे. नाईट लॅडींग सेवा सुरू होण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय उड्डाण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने काकडी विमानतळावर येणाऱ्या विमानांच्या फेऱ्या वाढणार आहे. व्यावसायिकांना चोवीस तास व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार असून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

विमान तळाचे उर्वरित प्रश्‍न सोडविण्यासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रवासी टर्मिनल साठी ५२७ कोटी निधी आ. आशुतोष काळे यांनी मिळविला आहे. त्यामुळे काकडी व परिसरातील व्यावसायिकांनी तसेच विमानाने येणाऱ्या साई भक्तांनी आ. काळे यांचे आभार मानले.