अहमदनगर बातम्या

राहुरी स्टेशन येथील भुयारी मार्गालगतच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेवुन लवकरच जमीन भू संपादनाची प्रक्रिया सुरू होणार असून श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केल्याने नागरिकांच्या येथील धोकेदायक रस्ता आता सरळ होणाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राहुरी रेल्वे स्टेशन येथे मार्च २०२० मध्ये भुयारी मार्गाचे काम झाले होते. परंतु पूर्व बाजूकडील भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित असल्याने सुमारे ५०० मीटर रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. याच ठिकाणी रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या ठिकाणी धोकेदायक वळण असल्याने नेहमीच अपघात होत असतात.

याबाबत नागरिक सदर धोकेदायक वळण सरळ करून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून करत आहेत. परंतु भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित असल्याने काम सुरू होत नव्हते.

काल शुक्रवारी (दि. १८) सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांनी रेल्वे, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासह शेतकऱ्यांशी चर्चा केली. अडचणी समजून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामुळे सदर प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर खिलारे, सुधाकर तनपुरे, युवराज तनपुरे, सोपान धागुडे, अविनाश गाडे, भैय्यासाहेब आढाव, विक्रम पेरणे, मच्छिद्र चव्हाण, उमेश पेरणे, यमुना भालेराव, तलाठी सोनाली जऱ्हाड, ग्रामविकास अधिकारी संजय भिंगारदे, बाळासाहेब तिजोरे पांडुरंग खडके, पत्रकार विनित धसाळ आदी उपस्थित होते.

राहुरी स्टेशन येथील भुयारी मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत संबंधित शेतकरी, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून अडचणी समजून घेतल्या असून संबंधितांना तशा सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office