अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदा रिक्षा चालकांचा अक्षरश सुळसुळाट झाला आहे. प्रवाशी कमी व रिक्षा जास्त अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान या रिक्षाचालकांमुळे मोठ्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. राहता ते शिर्डी दरम्यान मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे अवैध तीनचाकी रिक्षा प्रवासी वाहतूक सुरु आहे
रिक्षावरील चालक नेहमी वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रिक्षा चालवितात मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज होईल अशा प्रकारे गाणे वाजवत बेधुंद वावरत असतात.
अनेक रिक्षा चालकांकडे लायसन्स नाही आहे. अनेक अल्पवयीन मूल वय पूर्ण नसतानाही रिक्षा चालवितात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे .
दरम्यान हा सर्व प्रकार खुलेआम सुरु असून याबाबत वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी संतापाची लाट उसळली आहे.
जर लवकरात लवकर हा प्रश्न नाही सुटल्यास शहरातील विविध संघटना सुज्ञ नागरिक यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.