अहमदनगर बातम्या

कोपरगावात विकासाची घोडदौड सुरू ! आमदार काळे म्हणाले…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आ. आशुतोष काळे यांनी मागील चार वर्षात कोपरगाव शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे मुलभूत विकासाची कामे मार्गी लागली असून नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत.

हा विकास कामांचा धडाका आजतागायत सुरू कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात विकास कामांची घौडदौड सुरूच असल्यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

याबाबत आ. काळे यांनी पत्रकात म्हटले आहे की, विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या कोपरगाव शहराची धुळगाव अशी ओळख झाली होती. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच मुख्य रस्त्यांबरोबरच अनेक प्रभागातील रस्त्यांचा देखील विकास खोळंबला होता.

स्वच्छता व आरोग्याचा देखील प्रश्न न सुटल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. आ. काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी व कोपरगाव शहराच्या नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

सर्वच मुख्य रस्त्यांचा विकास झाल्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. कोपरगाव शहर सुशोभिकरण, विविध समाजाचे सामाजिक मंदिर, स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमी विकासासाठी देखील आ. काळे यांनी निधी दिल्यामुळे मागील अनेक वर्षापासून विकासापासून दूर असणाऱ्या कोपरगाव शहरात असंख्य विकास कामे पूर्ण झाली असून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत.

यामध्ये प्रभाग क्रमांक ४ वडांगळे वस्ती, प्रभाग क्रमांक १ समतानगर, हद्दवाढ भाग, प्रभाग क्रमांक ८, प्रभाग क्रमांक ६, प्रभाग क्रमांक ३ याठिकाणी रस्ते व भूमिगत गटारी आदी कामांनी वेग घेतला असून व शंकर नगर येथील पुलाचे काम सुरु असून उर्वरित प्रभागातील विकास कामे देखील लवकरच सुरु होणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

कोपरगाव शहराच्या नागरिकांना कोपरगाव शहराचा सर्वागिण विकास व नागरिकांच्या मुलभूत विकासाच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी आ. काळे यांनी दिलेले वचन पूर्ण करतांना विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या कोपरगाव शहराला विकासाच्या वाटेवर घेवून येण्यात आ. काळे यशस्वी झाले असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office