लष्करातील जवान हे देशाचे खरे हिरो -सेवानिवृत कर्नल डॉ.सर्जेराव नांगरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- देश सेवा करुन सेवानिवृत्त झालेल्या लष्करातील अधिकारी व माजी सैनिकांचा जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला.

तपोवन रोड येथील संघटनेच्या माध्यमातून उभे राहत असलेल्या शहीद स्मारक येथे हा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मॅक्स केअरचे डॉ. जरे, सेवानिवृत कर्नल डॉ.सर्जेराव नांगरे, मेजर निळकंठ उल्हारे, मेजर अशोक चौधरी, अ‍ॅड पोपट पालवे, उद्योजक सुरेश बडे, निवृत पोलिस अधिकारी नारायण घुले, अ‍ॅड.संदिप जावळे, जितेंद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ औटी, एसबीआयचे रविकुमार जगताप, अमृता शेटे, जयाताई पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी सैनिकांचा सत्कार करुन गौरव करण्यात आला.

सेवानिवृत कर्नल डॉ.सर्जेराव नांगरे म्हणाले की, लष्करातील जवान हे देशाचे खरे हिरो आहेत. जिवाची व आपल्या कुटुंबीयांची पर्वा न करता ते देश रक्षणाचे कार्य करीत असतात. समाजाने देखील त्यांना सन्मान देण्याची गरज आहे. सेवानिवृत्त होऊन देखील माजी सैनिक सामाजिक सेवा करीत असून, जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने उभे केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे.

या फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याने भारावून आपण देखील या कार्यात हातभार लावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. नुकतेच भारतीय सैन्यातून सेवानिवृत झालेले कर्नल डॉ.सर्जेराव नांगरे, संभाजी ससे, गोरक्षनाथ पालवे, संदिप कराड, सुनिल गुंजाळ, दादाभाऊ बोरकर, शिवाजीराव गर्जे, अरूण शिंदे, विजय घुले, नवनाथ वारे, मानव झिरपे, संतोष कोंडके, बाबासाहेब गिते, लक्ष्मण सत्रे, रईस सय्यद, लक्ष्मण शिंदे, शरद दरंदले, बद्रिनाथ इसरवाडे, अरूण ईखे, ओमप्रकाश शिंदे, सि.बी. कापसे, मच्छींद्र नागरगोजे, नामदेव गवळी यांचा जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृती भाबड, जगन्नाथ जावळे, संजय पाटेकर, विठ्ठल लगड, महादेव शिरसाठ, अमोल निमसे, कुशल घुले, भाऊसाहेब देशमाने, अनिल पालवे, संतोष शिंदे, गणेश पालवे, अंकुश भोस, गणेश अंधारे, महादेव गर्जे, अंबु बडे, दतात्रय बांगर, बन्सी दारकुंडे, आंबादास लहारे, भगवान आव्हाड, दुशांत घुले, बाजीराव गोपाळघरे, शांतीलाल सानप, खंडेराव लेंडाळ, अशोक पालवे, उद्धव थोटे, भगवान डोळे, हरीदास भाबड, भरत शिरसाठ आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते.

डॉ. जरे यांनी माजी सैनिकांच्या कृतज्ञतेपोटी मॅक्स केअरच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव शिरसाठ यांनी केले. आभार शिवाजी पालवे यांनी मानले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24