महसूलमंत्री म्हणतात गावपातळीवरील निवडणूका एकत्र लढणे अवघड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- ग्रामपंचायतीचे राजकारण गावपातळीवर असल्याने या निवडणूका एकत्रितपणे लढणं अवघड आहे.

प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवण्याची इच्छा आणि जबाबदारी असते. त्यानुसार राज्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व रहावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणूकांमध्ये मिळालेल्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेलं असून त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामंपचायत निवडणूकांच्या माध्यमातून पहायला मिळेल असे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे केले.

विरोधकांना खडेबोल सुनावले विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने केली जात असलेल्या टीकेला महसूलमंत्र्यांनी खास आपल्या भाषेत उत्तर दिले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आलंय की भाजप संपत चाललाय, गेल्या काही निवडणूकांमधून हेच दिसून आलंय. त्या नैराश्यातूनच ते वेगवेगळी वक्तव्य करीत असतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

विरोधकांकडून महाविकास आघाडीत बिघाड करण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24