समाजकंटकाने गायरान क्षेत्राला लावली आग; लाखो रुपयांची संपत्ती जळून खाक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यातील नगर दौंड रस्त्या लगत असलेल्या कोळाई देवी मंदिराच्या माळरानावरील गायरान क्षेत्राला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली आहे.

यामुळे लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील नगर दौंड रस्त्यालगत असलेल्या कोळाईदेवी मंदिराच्या माळावरील असलेल्या २८ एकर गायरान क्षेत्राला अज्ञात व्यक्तीने आग लावली .

मात्र याबाबत कोळगावचे उपसरपंच अमित लगड यांना समजताच त्यांनी तत्काळ हालचाल करत लागलेली आग तरुणांच्या साहाय्याने आटोक्यात आणल्याने सुमारे ३ एकर क्षेत्रावरील गवत तसेच लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक झाल्याची घटना घडली.

याठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतिची जमीन असून या याठिकाणी जनावरांसाठी चारा चारण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून माळरानाचा भाग असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात ससे, हरिण, तरस, दुर्मिळ पक्षी, वन्यजीव असून या जंगलाला अज्ञात व्यक्तीने आग लागल्यामुळे मोठ्याप्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24