अहमदनगर बातम्या

पाथर्डीत कॉपी बहाद्दरांचा उच्छाद ! दहा मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका झेरॉक्समध्ये येते

Published by
Ahmednagarlive24 Office

पाथर्डी शहर व तालुक्यात बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांनी उच्छाद मांडला आहे. पास करुन देण्याची हमी घेणारे शिक्षणसम्राट त्यांच्या यंत्रणेकडुन विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत आहेत.

पेपर सुरु झाल्यानंतर दहा मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका झेरॉक्समध्ये येते. बुधवारी शहरात पाच विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले आहे.

कोरडगाव येथे बुधवारी कॉपीचा महापुर होता. येथील एका विद्यालयात सुमारे ७५ विद्यार्थी हे बाहेरच्या जिल्ह्यातुन आलेले आहेत. पाथर्डी शहरातही मुंबई पुणे, सातारा, कोकण, नाशिक या भागातुन विद्यार्थी आले आहेत.

प्रांतअधिकारी प्रसाद मते, गटविकास अधिकारी शिवाजी काबंळे, डॉ. जगदिश पालवे, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, नायब तहसिलदार बागुल, महसुल, पोलिस व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी भरारी पथके फिरत आहेत.

तालुक्याला कॉपीचा लागलेला कलंक पुसण्याचे काम अधिकारी व यंत्रणेतील लोक करीत आहेत. ठरावीक दोन तिन लोकांच्या पैसे कमविण्याच्या हव्यासामुळे कॉपीला बळ मिळतय.

पूर्व भागात दोन संस्थाचालक तर शाळा उघडत नाहीत. मात्र त्यांच्याकडे अडीचशे ते चारशे विद्यार्थी परीक्षेसाठी आहेत. यांच्या शाळा तपासल्या का जात नाहीत. परजिल्ह्यातील विद्यार्थी नेमके याच शालेत कसे येतात. याचा तपास शिक्षण विभागाने केला पाहीजे.

नगरच्या शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचेही याला पाठबळ आहे. पाथर्डीच्या शिक्षण विभागाचाही याला छुपा आशिर्वाद आहे. कॉपी पुरवणारे रॅकेट यांचेच आहे. शाळा उघडत नाहीत यांचे शिक्षक कसे असतात. हे पाहीले पाहीजे.

त्यांच्या अकरावी व बारावीच्या सराव परीक्षा, तिमाही, सहामाही व पूर्व परीक्षा, प्रात्याक्षिक परीक्षा याचे रेकॉर्ड का तपासले जात नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी राज्याचे शिक्षण विभागाचे सचिव यांच्याकडे केली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे जाऊन ही तक्रार केली आहे. कॅपीला बळ देणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.

अनेक परीक्षा केंद्र हे हॉटस्पॉट बनली आहेत. सवेंदनशील केंद्र असुनही तेथे कारवाई केली जात नाही. पैसे दिले की काही होत नाही. आमचे कोणीच काही बिघडवु शकत नाहीत. असे काही संस्थाचालक बोलुन दाखवित आहेत. अशा लोकांवर कारवाई व्हावी व येथील प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा.

Ahmednagarlive24 Office